एका मिनिटात दाढ उचकता येते?

चार दिवस अगोदर 'दाढ दुखत्येय' म्हणून ठणाणा करत डेन्टिस्टकडे गेलो, तर दाढेला इंफाकॅशन झाल्यानं त्यांनी ती दाढ काढायला लागेल हे शुभवर्तमान दिलंन! अक्कलदाढ असल्यामुळे त्या तज्ञानी मला 5000 चा कोटेशन दिलंन !
मंग काय खिशेला झळ व मनाला कळ नाही लागावा म्हणून मी डोंबिवली लोकल ने सी.एस.टी गाठली सेंट जॉर्ज केंद्रीय दन्त रुग्णालयात जाऊन धडकलो.

10₹चा केस पेपर काढले त्या डॉक्टरीन मॅडम नी फोकस मारून दाढ बघून पुढची तारीख 20 एप्रिल दिल्यानं.

माझा एक एक दिवस  दांतदुखा मुळे मरणाचा हाल होता 1 तास माझ्या साठी जणू साल होता.. मंग काय मोबाईल वरुन लावला फोन आमच्या ग्रुपच्या जेष्ठ वय व्यक्तीमत्व जितूदा ला मंग काय लगेच राज्यमंत्री च्या PA चा मंत्रालया तुन फोन... हॉस्पिटल च्या डीन चा माणूस विचारात आला शाम गौड कोण..?

मंग काय मोठा श्वास घेत जीवात जीव आला मी निमूटपणे त्या तज्ञयासमोर जबडा वासून बसलो. एकंदरीत प्रकार बघून म्हंटलं आता बहूदा "तासभराची निश्चिंती झाली बगूनाना sss ". पण त्या प्राण्याने दाताड बधीर करायला ३० सेकंदात ३ इंजेक्क्षनं दिलीन, जेमतेम पाव मिनीट थांबला नी मी सरसावून बसतोय तोवर पुढच्या ३० सेकंदात सर्जरी करून पकडिने दाढ काढून मोकळा! हे म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला बसावं, नी 'केशवाय नमः, नारायणाय नमः...' म्हणून आचमन संपतंय तोपर्यंत गुरूजीनी 'हं चला, नैवेद्य आणा, सगळ्याना आरतीला बोलवा' म्हणावं तसं झालं !

असो, पटकन् सुटका झाली म्हणून आनंद पण झाला आणि आपल्या डोंबिवलीतल्या  प्रायव्हेट डॉक्टर सद्-गृहस्थाने  माझा खिसा केवळ मिन्टाभराच्या करामतीने बराचसा हलका केला असता पण वाचलो!!

धन्यवाद डोंबिवली चे लाडके आमदार व महाराष्ट्राचे राज्यमंत्री रविंद्रजी चौहाण यांना.

हे प्रथमच नव्हता पण या अगोदर ही मुंबईतल्या बऱ्याच मोठ्या नावाजलेल्या रुग्णालयात आज ही हाक मारल्यास मदतीचा हात प्रत्येक गरजू रुग्णासाठी धावत आहे..जरी किती ही पद विभूषले पण डोंबिवलीकरांन वर हा असलेला प्रेम कायम आहे. असे मला दिसून येत आहे।

- (बत्तीसावा गमावलेला)
    सामाजिक कार्यकर्ता
          शाम गौड

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......