संदेश

अगस्त, 2015 की पोस्ट दिखाई जा रही हैं

ढोंगी स्वातंत्र्य

चित्र
ढोंगी स्वातंत्र्य तो म्हणाला राजस्थानमध्ये म्हणे आजही बालविवाह होतात आणि देशात रोज दोन तरी मुली हुंड्यासाठी जाळल्या जातात मी म्हणालो, अरे बाबा, बालविवाह आणि हुंडा फक्त सरकारी कागदावरच गुन्हा आहे पण आज तरी गप्प बस ! आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे!! तो म्हणाला बिहार मधला दलित म्हणे गोळीचा शिकार होतोय दलित महिलेची नग्न धिंड काढून चार चौघात बलात्कार होतोय. मी म्हणालो,महिले बिहिले वरती नाही हा लोकशाहीवर बलात्कार आहे पण आज तरी गप्प बस, आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. तो म्हणाला, खून दरोडे घालणारे आमदार खासदार होतात न्याय हक्कासाठी लढणारे गुन्हेगार ठरविले जातात मी म्हणालो, त्यांच्या हाती काठी त्यांचीच बाबा म्हैस आहे पण आज तरी गप्प बस आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे!! तो म्हणाला, स्वातंत्र्यलढयातून पळणा-यांना स्वातंत्र्यवीर केलं जातं भगतसिंगाच्या बलिदानाला आतंकवादी ठरवलं जातं मी म्हणालो, लेखन्या ज्यांनी काबीज केल्या त्यांच्या जात वर्गाचाच जयजयकार आहे. पण आज तरी गप्प बस्स! आज खरचं देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे!! तो म्हणाला, कुपाेषणानं मुलं मरतात जरी तुडूंब भ