संदेश

मई, 2015 की पोस्ट दिखाई जा रही हैं

या गुन्हेगारांना गचंड्या देणार कोण??

चित्र
डोंबिवली सह कल्याण तालुक्यातील व जिल्ह्याच्या औद्योगिक व रहिवाशी पट्ट्यातील गुन्हेगारी जगताचा इतिहास गेल्या काही काळापासून रक्तरंजित झाला आहे. हे मागील काही घटनांमुळे आता लपून राहिले नाही . आता ह्या फोफावत्या गुन्हेगारीचा प्रश्न सामाजिक स्वास्थ्याच्या पथ्यावर पडत असल्याचे नागरिक उघड पणे बोलू लागले आहेत . काही गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व औद्योगिक भागात पूर्वी पासून आहे. या टोळ्यांत राजकारण्याच्या चेल्यां चपट्या पासून मध्यम व कनिष्ट वर्गातील तरुणांचे प्रमाण वाढत आहे. नाक्यानाक्यावर उभा राहणारा तरूण त्यात शिक्षीत वा अशिक्षीत दोन्हीवर त्या गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे . हा या टोळीचा तो ह्या टोळीचा .तो कंपनी टच आहे या चर्चा सर्वत्र होत आहे . काहीवाट चुकलेले तरूण योगयोगाने म्हणा वा भाई बनण्याच्या इर्षेने,परिस्थितीमुळे, बेरोजगारी, झटपट पैसा मिळविण्याच्या नादात गुन्हेगारी क्षेत्रा कडे आकर्षित होत आहेत ,स्वताचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याच्या नादात आपल्याच आयुष्याचा खेळखंडोबा करुन घेत आहेत . कायधाचे उल्लधंन केल्यास तेथे गुन्हा घडतो ही झाली गुन्ह्याची सर्वस