या गुन्हेगारांना गचंड्या देणार कोण??

डोंबिवली सह कल्याण तालुक्यातील व जिल्ह्याच्या औद्योगिक व रहिवाशी पट्ट्यातील गुन्हेगारी जगताचा इतिहास गेल्या काही काळापासून रक्तरंजित झाला आहे. हे मागील
काही घटनांमुळे आता लपून राहिले नाही .

आता ह्या फोफावत्या गुन्हेगारीचा प्रश्न सामाजिक स्वास्थ्याच्या पथ्यावर पडत असल्याचे नागरिक उघड पणे बोलू लागले आहेत . काही गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व औद्योगिक भागात पूर्वी पासून आहे. या टोळ्यांत राजकारण्याच्या चेल्यां चपट्या पासून मध्यम व कनिष्ट
वर्गातील तरुणांचे प्रमाण वाढत आहे. नाक्यानाक्यावर उभा राहणारा तरूण त्यात शिक्षीत वा अशिक्षीत दोन्हीवर त्या गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव मोठ्या
प्रमाणात दिसून येत आहे . हा या टोळीचा तो ह्या टोळीचा .तो कंपनी टच आहे या चर्चा सर्वत्र होत आहे .
काहीवाट चुकलेले तरूण योगयोगाने म्हणा वा भाई बनण्याच्या इर्षेने,परिस्थितीमुळे, बेरोजगारी, झटपट पैसा मिळविण्याच्या नादात गुन्हेगारी क्षेत्रा कडे
आकर्षित होत आहेत ,स्वताचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याच्या नादात आपल्याच आयुष्याचा खेळखंडोबा करुन घेत आहेत .

कायधाचे उल्लधंन केल्यास तेथे गुन्हा घडतो ही झाली गुन्ह्याची सर्वसाधारण व्याख्या सांगितली जाते . चार ,पाच जण किंवा त्याहून अधिक यांनी एकत्र पणे
येऊन केलेला गुन्हा म्हणजे संघटीत गुन्हा. पण हाच सघटित गुन्हा अनेक जण येऊन म्होरक्यामार्फत करतात तेव्हा टोळी निर्माण होते. या टोळ्या
याभागातील दहशतीच्या बळावर औद्योगिक क्षेत्रात कामे, ठेके ,दुकानदारां, व्यावसायिक मंडळीं कडुन हप्तेबाजी मिळविण्यासाठी धडपड करतात ,मग याच आर्थिक कारणावरून
त्यांच्यात अस्तित्वासाठी,हुकूमतीसाठी दंगे धोपे ,खुनखराबा निर्माण होतो .अशीच लढाई डोंबिवली,कल्याण तालुक्यासह जिल्ह्याच्या इतर भागांन मध्ये सुरु आहे.
टोळ्या त्यांचे गुंड यांच्या दहशतीची सामान्यजनांनाही त्याची झळ बसत आहे . या भागातील गुन्हेगारीचे मूळ वाळू ,बांधकाम साहित्य ठेके, कामगार
पुरविण्याचे ठेके ,जमीन व्यवहार याभोवती फिरताना दिसत आहे. वाळू माफियांचा प्रश्नही प्रकर्षाने ऐरणीवर आहे.गुन्हेगारी जगतातील स्थान अबाधित राहावे, याकरिता
रक्तरंजित संघर्षाचा नवा ट्रेंड सुद्धा शहर ,तालुका ,जिल्ह्यत सुरु झाला आहे.बहुतांश घटनांच्या मुळाशी जाऊन सर्व पाळेमुळे खोदण्याच्या भानगडीत पोलिसांची न जाण्याची
वृत्ती राजकीय दबावानुसार काम करण्याची पद्धती ,मूळ घटनेला बगल देऊन बदलला जाणारा घटनाक्रम यामुळे खऱ्या गुन्हेगार मंडळींचे फावत असल्याची
जनभावन आहे.
निरनिराळ्या ठेकेदारीच्या माध्यमातून याभागात काहींनी या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर माया जमविल्याची अनेक उदाहरणे आहेत.
मात्र राजकारणी आणि पोलिसांची त्यांना साथ मिळत असल्याच्या पक्क्या समजातून नागरिकही 'नरो वा कुंजरो वा ' अशीच भूमिका घेत आहेत .

संघटीत गुन्हेगारीटोळ्यांना अंत झाला आहे असे पोलिसांकडून ठाम पणे सांगण्यात येत असले तर मग त्याच टोळ्यांच्यानावांचा वापर करून निरनिराळ्या घटनांत सर्वसामान्यांना
धमकावणारे खुले आम एकमेकांचे गळे घोटणारे आहेत तरी कोण हा प्रश्न निरुत्तरच राहतो.या भागात काही प्रस्थापित मंडळीची प्रचंड
दहशत आहे .त्यांच्या नुसत्या नावावर ठेकेदारी ,जमीन व्यवहार असे अनेक व्यवसाय (नव्हे धंदे)या भागात चालतात.कितीही अन्याय झाला तरी
या मंडळीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही.कारण त्यांचा राजकीय वरदहस्त ,पोलीस प्रशासनाशी त्यांचा असलेला घरोबा या बाबत सर्व
सामान्यां सुद्धा सर्व काही कळून चुकले आहे.त्या मुळे अशा मंडळींचे पोलीस रेकोर्ड तयारच होत नाही .पोलीस म्हणतात त्यांच्या ( गुंडा बाबत)बाबत
एकही तक्रार नाही.त्या मुळे कायदा आणि सुव्यवस्था खुले आम अशी पायदळी तुडवली जाते.

आणि जर का कोण दक्ष नागरिक या नात्याने गुंडपुंडांच्या अन्यया विरोधात आवाज उठवला की त्याचा ही आवाज बंद करण्यास काही गुंड,पोलिस- राजकारणी मंडळी ही एकत्रित पणे सरसवतात ज्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना ही खोट्या केस कथनात्मक पद्धतीने गुन्हेगार या नावाचे नामफलक लावुन त्याच्या आयुष्याला बर्बादीच्या वाटेवर नेण्याचा इतपत ही याच कायदे सुव्यवस्थेचे रकक्षकांन कडुन भकक्षक वृत्ती घडवुन एक सामाजिक कार्यकर्ता असो किंवा समान्य दक्ष नागरीक आखेर त्यांची  मुस्काटदाबी करण्यास यशस्वी होतात. .. आणि आमच्या तुमच्या सारख्ये नागरिकांतील दक्ष व अन्याय विरोधी लाटांना सीमांकित तलावचे स्वरुप देउन शांत करण्यत यते.

जिल्ह्यात पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि वी.वी. लक्ष्मीनारायण यांच्यासारखा खमक्या अधिकारी, त्यांच्या जोडीला साधारणपणे अशीच दुसरी फळी जिल्ह्य़ाच्या पोलीस दलातसध्या कार्यरत आहे.

एकिकडे गुन्हेगारीविरुद्ध जोरदार कारवाया सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे गुन्हेगारी प्रचंड वाढते आहे. एक झाले की एक अशा गुन्हेगारी
साखळीने जिल्हाभर कमालीची दहशत निर्माण केली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लागेबांधे ही या वाढत्या गुन्हेगारीतील आणखी चिंतेची बाब आहे. या प्रकारांनी कल्याण-डोंबिवली सह जिल्ह्य़ातील सामाजिक वातावरण चांगलेच कलुषित झाले
आहे. कडक कारवाया सुरू असताना गुन्हेगारी फोफावते याचा अर्थ काय घेणार? असे का व्हावे? पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवरील नैसर्गिक वचक संपुष्टात
आला की खालची यंत्रणा प्रमुखांना साथ देईना? कारणे अनेक आहेत.
परिस्थिती अशीच राहिली तर शहरा भागातील गुन्हेगारी हाताबाहेर जाऊ शकते. पोलिसांचा दरारा वाटून उपयोग नाही, तो प्रस्थापित
झाला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनाही सजग राहावे लागेल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......