हसण्यासाठी निमित्त शोधूया......

कामा निमित्त कल्याण खांबाळंपाडा या भागात फेरफटका झाल्यानंतर घरी परततांना माझी नजर छत्रपतींच्या पदस्पर्शाने ने पावन दुर्गाडी किल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वर पडली जे की पूर्णपणे उघडे होते काही भाविक ही येत जात होते विचार केला वर जाऊन खाडी व पावसाळी हिरवाई चे ही आकर्षक दृश्य पाहता येईल...
प्रशासकीय अटी शर्त पाहता दृश्य काय एवढा पाहता आला नाही वरती मंदिर परिसरात एका बकड्या वर निवांतपणे बसलो त्या क्षणीं माझी नजर तिथल्या चिल्लर पार्टी वर पडली हे त्या मुलांपैकी जे कुटूंबीय बिकट परिस्थिती मुळे भिख मांगणे किंवा इतर वस्तू विकताना दिसून येतील ..

आज पूर्ण देशात शहरात लॉक डाऊन कोरोना संकटा मुळे जिथे लोक भीती ताणतणाव ने भरलेलं दिवस जगात आहेत,
आणि एकी कडे हे मुलं बिनधास्त बेधुंद प्रसन्न मुखाने खेळत मस्ती करत होते ,
ह्यांना पाहता सकारात्मक ओळ आठवली,
जगात नैराश्याचे कारण बरेच आहेत, हसण्यासाठी निमित्त शोधूया...
मंग काय काढलं मास्क क्षणिक बडबड - गप्पा आणि येणाऱ्या भविष्य काळातील सेलिब्रिटींच्या बरोबर सेल्फी ही घेतली...

आशा आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रशासनाने आज ही देशातील लाखों वंचित कुटूंबाच्या मुलांच्या भविष्या ला घेऊन कधी तरी सक्रिय पाऊल उचलतील ज्या मुळे त्यांच्या वर शिक्षण घेण्याच्या वयात बाल मजुरी व भीक मांगण्याची वेळ येणार नाही...

                                      जय हिंद! जय महाराष्ट्र!!

सामाजिक कार्यकर्ता 
     शाम गौड

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".