ढोंगी स्वातंत्र्य

ढोंगी स्वातंत्र्य

तो म्हणाला राजस्थानमध्ये म्हणे
आजही बालविवाह होतात
आणि देशात रोज दोन तरी मुली
हुंड्यासाठी जाळल्या जातात
मी म्हणालो, अरे बाबा, बालविवाह
आणि हुंडा फक्त सरकारी
कागदावरच गुन्हा आहे
पण आज तरी गप्प बस !
आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे!!

तो म्हणाला बिहार मधला दलित म्हणे
गोळीचा शिकार होतोय
दलित महिलेची नग्न धिंड काढून
चार चौघात बलात्कार होतोय.
मी म्हणालो,महिले बिहिले वरती नाही
हा लोकशाहीवर बलात्कार आहे
पण आज तरी गप्प बस,
आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे.

तो म्हणाला, खून दरोडे घालणारे
आमदार खासदार होतात
न्याय हक्कासाठी लढणारे
गुन्हेगार ठरविले जातात
मी म्हणालो, त्यांच्या हाती काठी
त्यांचीच बाबा म्हैस आहे
पण आज तरी गप्प बस
आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे!!

तो म्हणाला, स्वातंत्र्यलढयातून
पळणा-यांना स्वातंत्र्यवीर केलं जातं
भगतसिंगाच्या बलिदानाला
आतंकवादी ठरवलं जातं
मी म्हणालो,
लेखन्या ज्यांनी काबीज केल्या
त्यांच्या जात वर्गाचाच
जयजयकार आहे.
पण आज तरी गप्प बस्स!
आज खरचं देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे!!

तो म्हणाला,
कुपाेषणानं मुलं मरतात
जरी तुडूंब भरली गोदामं असतात
उध्दाेगधंदयांना मोफत वीज
शेतकरी फास लावतात
डोनेशनचा आकडा एेकून
पालकांनाही चक्कर येते
संसद नावाच्या बाजारात
भारतमाता विकली जाते
मी म्हणालाे
चूप कर...गप्प बस !
भोसडीच्या किती  स्वातंत्र्याचा
अपमान करशील
खरं बोलणं पाप आहे
नक्शलवादी ठरवला जाशील !
नक्शल म्हणून मारला जाशील !!
नक्शल म्हणून मारला जाशील !!!

विद्राेही कवी शाहिर शंतनु कांबळे

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......