मुकेश अंबानी के अच्छे दिन आ... गये

ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं (!) अशा मुकेश आणि नीता अंबानी यांच्या रुग्णालयाचं नुकतंच पंतप्रधानांनी उद्घाटन केलं.. त्या गरीबांकरता बांधल्या गेलेल्या रुग्णालयाचे दर -

OPD - Rs 1100

30 days follow up - Rs 750

अनेक धन्यवाद..!

आदरणीय मोदीसाहेब,

मुंबईला आलाच होतात तेव्हा थोडा वेळ काढून आमच्या मुंबईची शान असलेल्या आमच्या के ईम एम रुग्णालयाला भेट द्यायला हवी होतीत..!

मान्य करतो की तिथे खूप गर्दी असते.. ते रुग्णालय मुळीच पॉश नाही.. परंतु तरीही तिथे ज्या प्रकारची ट्रीटमेन्ट रुग्णांना दिली जाते.. अनेक अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया किती कमी पैशांमध्ये होतात ते एकदा बघा..

मी स्वत: तिथे रात्री दोन दोन वाजता कसे सगळे पाच पाच, सहा सहा डॉक्टर एखादी इमर्जन्सी हाताळून एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवायचा कसा निकराचा प्रयत्न करतात हे किमान ५-६ वेळेला तरी बघितलं असेल..!

मोदीसाहेब.. अनेक वर्षापूर्वी अरुणा शानभाग या परिचारिकेवर बलात्कार होऊन ती परिचारिका कायमची स्तब्धच झाली..माणसातून उठली.. तिला आजही के ई एम च्या इतर सगळ्या परिचारिका आणि डॉक्टर्स आणि तमाम कर्मचारी वर्ग ती आपली मोठी बहीण असावी.. आई असावी या भावनेने कसा फुलासारखा जपतात ते पाहा एकदा मोदीसाहेब..!

आणि एक-दोन नाही.. तर आज जवळजवळ ३५ वर्ष झाली या गोष्टीला..!

मोदीसाहेब, नीता आणि मुकेश करता तुम्ही आपला बहुमोल वेळ देता.. तशीच केव्हातरी १० मिनिटं सवड काढून अरुणा शानभागलाही एकदा बघायला जा.. तुम्हाला कळेल की सेवा कशाला म्हणतात..प्रेम, आपुलकी कशाला म्हणतात..!

एरवी सचिन, बच्चन, सलमान यांच्यासारख्या अनेक बड्या बड्या धेंडांच्या उपस्थितीमध्ये गरीबांबद्दल बोलणे खूपच सोपे आहे..!

असो..!

1100 रुपये निदान आज तरी अनेकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.. त्यापेक्षा सायन, केम आणि नायरची आमची गरीबांची OPD च खूप बरी आणि आपुलकीची..!

नीता आणि मुकेशला त्यांच्या या नव्या व्यवसायाबद्दल अनेक शुभेच्छा..!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......