व्यापारींची दिवाळी ,गरिबांचा दिवाळा


आज दीपावली आहे. ही दीपावली 121 कोटी भारतीयांना सुखी संपन्न आणि आनंदी आयुष्य जगण्यात सहाय्यभुत ठरो, हीच अपेक्षा..
चार्ल्स डिकन्स या नावाचा एक महान कादंबरीकार इंग्लंडमध्ये होवून गेला. त्याने Tale Of Two Cities या नावाची एक कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीची सुरुवात करतांना तो म्हणतो, की 'तो उत्कृष्ट काळ होता; तो अगदी निकृष्ट काळ होता. ते शहानपनाचे युग होते; ते मुर्खपनाचे युग होते. तो कालखंड श्रद्धेचा होता; तो कालखंड अश्रद्धेचा होता. तो काळ प्रकाशाचा होता; तो अंधाराचा होता. तो आशेचा वसंतऋतू होता; तो निराशेचा शिशिरऋतू होता. आपल्यासमोर सर्व काही होते; आपल्यासमोर काहीच नव्हते. आम्ही सर्वजन सरळ स्वर्गात जाणार होतो; आम्ही सर्वजन सरळ नरकात जाणार होतो.'
अर्थात, डिकन्सचे हे उद्गार तत्कालीन फ्रेंच राज्यक्रांती संदर्भात आहेत. पण परिस्थिती आजही बदललेली नाहिए. तमाम भारतीयांना 'अच्छे दिन आयेंगे' ही आशावादी साद घालत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. त्यालाही आज 5 महीने होत आले आहेत. अच्छे दिन सोडाच, कॉंग्रेसच्या काळात ज्या हालअपेष्टा सहन करत सामान्य जनता जगत होती, ते जगने सुसह्य होण्याऐवजी आणखी दुसह्य झाले आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर मधुमेहाचे जे औषध 5 महिन्यांपूर्वी ₹8000 ला येत होते, ते आता ₹1 लाखाहुनही महाग झाले आहे. या देशातल्या 10 कोटी मधुमेही रुग्नांसाठी अच्छे दिन आहेत की बुरे ते तुम्हीच सांगा मित्रांनो. कैंसरचे ₹8500 चे औषध आता ₹108000 पर्यंत जावून पोहोचले आहे. ब्लड प्रेशरचे ₹147 चे औषध आता ₹1615 ला मिळतेय. ₹50 चे डिजेल ₹70 पर्यंत गेले आहे. आणखी काय आणि किती सांगणार. मोदी साहेबांच्या अमेरिका दौऱ्यानंतर या साऱ्या कीमती वाढल्या आहेत, हे विशेष!
मग आमच्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडायला लागला आहे, की सरकार नेमकं चालवतंय कोण? भारतीयांनी निवडून दिलेले प्रतिनिधी की भारत आणि अमेरिकेतील भांडवलदार..? अच्छे दिन नेमके कोणाचे आले आहेत?
ग्लोबल वेल्थ इंडेक्सच्या 2014 च्या अहवालानुसार आपल्या देशातील 10% लोकांकडे 74% संपत्ती एकवटलेली आहे आणि 90% लोकांकडे फक्त26%संपत्ती आहे. प्रश्न असा आहे की हे सरकार 10% साठी काम करत आहे, की 90% लोकांसाठी. सरकार कॉंग्रेसचे असो की भाजपचे सामान्य जनतेच्या जगण्यात काहीही फरक पडणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, आणि काही फरक पडलाच तर जनतेचं जगणं आणखी कठीन झाल्याचा फरक जनतेला जाणवेल. हे लिहितांना फार वेदना होत आहेत, पण हे सत्य आहे. या देशात सद्ध्या विद्यमान असलेल्या कोणत्याही पक्षाचं शासन आलं, तरी जनतेच्या जीवनात काहीही फरक पडणार नाही, कारण या देशातलं सरकार सामान्य शेतकरी-कष्टकरी-कामकरी यांच्या मतांवर निवडून जातं, ते काम मात्र टाटा-बिर्ला-अंबानी यांचं करतं, हे निर्विवाद सत्य आहे.
म्हणून डिकन्सने म्हटल्या प्रमाणे हा उत्कृष्ट काळ आहे पण भांडवलदारांसाठी.. श्रीमंतांसाठी.. माफियांसाठी.. मनुवाद्यांसाठी..
ही दिवाळी सुद्धा अशा 10% लोकांसाठीच समृद्धी घेवून आली आहे, बाकि 90% लोकांचे दिवाळे केव्हाच निघाले आहे..

http://facebook.com/chhatrapatiyuva

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......