रुग्णालयाला कडोमपा चा आधार नागरिक लाचार

क.डो.म.पा. प्रशासित डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या निष्काळजीपणा व कामचुकार कारभारा ने  डोंबिवलीतील पर्यावरण प्रेमी प्राणी संरक्षक भरत केणे ह्यांची बळी घेतली.

हे प्रथमच न्हवे वर्षभरात असे अनेक रुग्ण - बाधित नागरिक आपले प्राण ज्योती गमावतात ते फक्त या क.डो.म.पा संचालित शास्त्रीनगर रुग्णालय च्या भोंगळ्या व अपुरे यांत्रिक अभियांत्रिकी सुव्यवस्थापणा मुळे .
सर्प दंशाचा लस नसल्याने डॉक्टर व क.डो.म.पा. प्रशासना चा हलगर्जीपणा भरत केणे च्या जीवावर बेतली आहे

अशी घटना आज ही सहज तुम्हाला रुग्णालयात पाहायला मिळेल डॉक्टरांना जाब विचारल्यास इथे यंत्रणा मशीन किंवा तज्ज्ञांचा अभाव सांगत रुग्णांना खासगी रुग्णालय ची चिठी किंवा आर्थिक परिस्थिती ने नाजूक असणाऱ्या रुग्णांना कळवा, मुंबई च्या रुग्णालयाचे नावे सांगत बाहेरचा रास्ता दाखविला जातो. .ज्यात पुरुषानं सह स्त्री व लहान मुलांचा ही जास्त समावेश असतो.

अश्याच वेळी अधिक गंभीर परिस्थिती असणारा रुग्ण कळवा, मुंबई च्या हॉस्पिटल ला पोहचता पोहचता रस्त्यात अँबुलेन्स मधेच अखेरचा श्वास घेतो... ज्याने करून डोंबिवली शहरासह ग्रामीण गावांच्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे .

आज भरत केणे नसल्याने या शहराने फक्त एक सर्प मित्र पर्यावरण रक्षक नाही हरवला तर एका कुटुंब -मित्राने ने आपला मुलगा,भाऊ,मित्र गमावला आहे!

जरी शहरातल्या प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी नी शास्त्रीनगर हॉस्पिटल मधे लोकहितार्थ प्रशासनिक सुविधा सुव्यस्था  सुधारावण्या करिता कित्येक वेळा पत्रव्यवहार अर्ज निवेदन दिली असले तरी ही आज ही जशी ची तशी परिस्थिती कायम आहे.

आत्ता हेच म्हणणं आहे माझा की जर असक्षम कल्याण डोंबिवली महानगर पालिके ला शास्त्रीनगर रुग्णालया संबधित नागरिकच्या प्रश्न सोडवता येत नसतील तर
सदर रुग्णालय सरकारकडे लवकर हस्तांतरित करण्यात यावे..!

अन्यथा लवकरच काहीच दिवसात छत्रपति_युवा_फ्रंट द्वारे सर्व मित्र संस्था-संघटने ला एकत्रित करुंन क.डो.म.पा प्रशासना विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल...

सामाजिक कार्यकर्ता
     शाम गौड

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......