गौरी लंकेश ला कुणी मारलं?

गौरी लंकेशंना कुणी मारलं?

गौरी लंकेशंना गोळी लागली
गौरी लंकेशंना कुणी मारलं?
ज्यांनी पानसरेंना मारलं
पानसरेंना कुणी मारलं
ज्यांनी नरेंद्र दाभोलकरांना मारलं।
नरेंद्र दाभोलकरांना कुणी मारलं?
ज्यांनी लेखक पेरुमलना 'विनामृत्यू' मारलं,
लेखक पेरूमलना कुणी मारलं?
ज्यानं महात्मा गांधींना पिस्तुलाच्या गोळीनं मारलं
महात्मा गांधींना कुणी मारलं?
ज्यांनी काळारामा समोर बाबासाहेबांना 'दगड' फेकून मारला।
बाबासाहेबांना दगड कुणी मारला?
ज्यांनी स्री शिक्षणासाठी झटणार्या सावित्रीला 'शेण' फेकून मारलं।
सावित्रीवर शेण कुणी फेकून मारलं?
ज्यांनं शिवाजींचा 'क्षात्रधर्म' नाकारला।
शिवाजींचा 'क्षात्रधर्म' कुणी नाकारला?
ज्यांनी तुकोबांच्या विचारांना पाण्यात बुडवून मारलं।
तुकोबांच्या विचारांना कुणी मारलं
ज्यांनी चोखोबाला जमिनीत जिवंत गाडून मारलं।
चोखोबाला गाडून कुणी मारलं?
ज्यांनी संभाजींना 'वेदप्रमाणित' शिक्षेनं मारलं।
संभाजींना वेदप्रमाणित शिक्षेनं कुणी मारलं?
ज्यानं फादर ग्राहम स्टेन्सला लहान मुलांसोबत जिवंत जाळून मारलं।
फादर ग्राहम स्टेन्संना कुणी मारलं?
ज्यांनं पेशावरमध्ये विद्यार्थ्यांना बाँबस्फोटात मारलं।
पेशावरमध्ये विद्यार्थ्यांना कुणी मारलं?
ज्यांनी इराणमध्ये महिलेला गाडी चालवली म्हणून मारलं।
इराणमध्ये गाडी चालवण्याचा गुन्हा करणार्या महिलेला कुणी मारलं?
ज्यांनी फुटबॉल सामना बघणार्यांना उंच इमारतीवरुन फेकून मारलं।
फुटबॉल बघणार्यांना कुणी मारलं?
ज्यांनी बलुचिस्तानमध्ये लहानग्यांचं 'बालपण' मारलं।
लहानग्यांचं बालपण कुणी मारलं?
ज्यांनी पत्रकार डँनियल पर्लला अपहरण करून मारलं।
पत्रकार डँनियल पर्लला कुणी मारलं?
ज्यांनी शर्ली हेब्डोच्या व्यंगचित्रकारांना गोळ्या घालून मारलं।
व्यंगचित्रकारांना कुणी मारलं?
ज्यांनी बांग्लादेशात हिंदूंना मारलं।
बांग्लादेशात हिंदूंना कुणी मारलं?
ज्यांनी गुजराथेत मुस्लिमांना मारलं।
मग गुजराथेत मुस्लिमांना कुणी मारलं?
ज्यांनी चर्चला आव्हान देणार्या गँलिलीओला तुरुंगात डांबुन मारलं।
गँलिलीओला कुणी मारलं?
ज्यांनी धर्मचिकित्सा करणार्या साँक्रेटिसला विष पाजुन मारलं।
अरे देवा धर्मचिकित्सा??
अच्छा!!! धर्मचिकित्सा करणार्या साँक्रेटिसला कुणी मारलं?
ज्यांनी मनुस्मृतीत स्रियांना मारलं।
स्रियांना कुणी मारलं?
ज्यांनी वर्णव्यवस्थेत क्षुद्रांना मारलं।
क्षुद्रांना कुणी मारलं?
ज्यांनी परंपरेच्या नावाखाली ९६.५%बहुजनांना वर्षानुवर्षे मारलं।
९६.५%बहुजन तरीही मेले?
या ९६.५% बहुजनांना कुणी मारलं?
ज्यांनी शब्दांना प्रमाण ठरवुन बुद्धीला मारलं।
बुद्धीला  कुणी मारलं?
ज्यांनी श्रद्धेला अंधश्रद्धा बनवून मारलं।
मग श्रद्धेला कुणी मारलं?
ज्यांनी  मुल्यांना मारलं।
सत्य,समता,बंधुता,एकता,न्याय आणि नैतिकता
या सार्या मुल्यांना कुणी मारलं?
ज्यांनी 'विवेकाला' मारलं।
मूल्य,बुद्धी,श्रद्धा आणि विवेक हे तर माझाच भाग
मूल्य,बुद्धी,श्रद्धा आणि विवेक यांनीच तर आली आयुष्याला जाग।
ज्यांनी मूल्यांना मारलं,बुद्धीला मारलं
श्रद्धेला मारलं,
विवेकाला मारलं
म्हणजे त्यांनी मलाही मारलं??
हो मलाही मारलं।
ज्यांनी मला मारलं त्यांनीच गौरी लंकेश यांनाही मारलं।

-डॉ.अमोल अशोक देवळेकर

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......