हो हीच ती पोरं.....




नमस्कार मित्रांनो मला आज लिहिताना एक वेगळ्या प्रकारचे संतुष्टी आणि आनंद  होत आहे...

ह्या  फोटो मधील ही काही पोरं तीच जे बऱ्याच वेळी विभागातील नाक्या वर मस्ती आणि हुल्लड बाजी करतात,
ही पोरं तीच आहेत जे आपसात गटबाजी करून शिव्या हाणामारी करतात, 

ही पोर तीच ज्यांच्या पासून परिसरातील काही नागरिक वैतगलेले असतात...
ही पोर तीच जे रात्रि किवा दुपारी मोकाट रस्त्यावर क्रिकेट खेळतांना चेंडू लोकांच्या खिडक्यां पत्र्या वर अपट्टात..

माझ्या विभागातील ही तेच मंडळी आहेत ज्याची तक्रार वर्षाच्या 12 महिने माझ्या कडे कोण ना कोण नागरिक करतात.. चला ही पहिली बाजू आहे,

आत्ता मी सांगतो दुसरी बाजू ही तीच पोरं आहेत  ,
जे गणेशोत्सव,स्वातंत्र्य दिवस,आंबेडकर जयंती व इतर सणात रात्र दिवस साज सजावट तैयारीत लागून आपली संस्कृती जोपासतात..

हीच पोर जे शिक्षणासह ,रिक्षाचालवून ,नोकरी-धंदा करून,
व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वतः ची जवाबदारी पार पाडत आहेत..!

ही तीच पोरं आहेत आपदा संकट,किंवा 26 जुलै सारख्या अतिवृष्टी पूरस्थिती , काळात छाती आणि कंबर भर पाण्यात उतरून लोकांची प्राण रक्षा करत त्यांना पाणी जेवण सुविधा साठी कायम हजर राहून माणुसकी धर्म निभावतात.

आज कोरोना या महामारी मुळे जिथे संपूर्ण शहर भयभीत तणावाखाली जगात आहे..

आज सुद्धा हीच पोरं मागील दीड महिने पासून निस्वार्थ पणे आयरे विभागातील समता नगर, सहकारनगर ,श्रीराम नगर सारख्या मोठ्या वस्ती भागात शासकीय निमशासकीय सोयी-सुविधा व जेवण वाटपाचे नियोजन करत आहेत स्वतः च्या जीवाची काळजी न करता घरच्यांच्या शिव्या ऐकून ही कार्यरत आहेत!

काल आमचे मार्गदर्शक स्थानिक नगरसेवक मा.मंदार टावरे यांच्या कडून सर्व स्वयंसेवक कार्यकर्त्यांना सुरक्षा किट वाटप करण्यात आले म्हणून मी धन्यवाद व्यक्त करतो..

आणि ही फक्त पोरं नसून तर माझ्या विभागातील माझे तरुण युवा स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत,ज्यांचा मला अभिमान आहे,

लवकरच सगळं व्यवस्थित होईल ...

सामाजिक कार्यकर्ता 
 शाम_गौड SRG



अशोक देवराय,मनोज भोगे, राहुल जाटव, लक्ष्मण माछा, श्री राम गुप्ता,सुशांत साहू ,राज मगरे,शफीक शेख गौरव ताटे,राहुल नेदवीणकेरी, राहुल आयवळे रणजित कनोजिया,अल्पेश,रवी देवराय,सदानंद बट्टू,व इतर आपण सर्वांचे जाहीर आभार....❤️

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......