हा रक्तगटा असलेल्या व्यक्ती ला कोरोना होण्याची जास्त शक्यता असू शकतो!

कोरोना व्हायरने जगभारात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 7 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असेलल्यांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका आहे. वृद्ध, लहान मुलं यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस ब्लड ग्रुपनुसार हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील क्लिनिकल रिसर्चकडून हा दावा करण्यात आला आहे. चीनकडून करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ब्लड ग्रुप A असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कमी धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.



चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे.

वुआनमधील सेंट मायकल रुग्णालयातील डॉ. प्रदीप चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लड ग्रुपचा अभ्यास केला गेला असून, A ब्लड ग्रुप असणारे लोक अधिक संशयित असल्याचं आढळून आलं असल्याचं ते म्हणाले.

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रक्तगट B आणि AB वर कोरोनाचा कोणताही खास परिणाम दिसूनआला नाही. परंतु, ब्लडग्रुप O असणाऱ्या व्यक्तींना कोरोना धोका कमी असल्याचं दिसून आलं.

चीनने जरी असा दावा केला असला, तरी NDMC चे आयुर्वेदिक रुग्णालयातील माजी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. डीएम त्रिपाठी यांनी सांगितलं की, कोरोनाचा ब्लड ग्रुपशी संबंध नाही. कोरोना व्हायरसचा संबंध ब्लड ग्रुपशी नसून, प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीनुसार होत असल्याचं ते म्हणाले. अधिक वय असणाऱ्या वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशांना करोनाचा अधिक धोका असल्याचं त्यांनी सांगितलं.

तर कृपया करून काळजी घ्या आपण सर्वांनी घरी थांबून सरकार आणि देशाला साथ देऊ कोरोना वर मात करू..

जय हिंद 
जय महाराष्ट्र..

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......