हरले भीमराय माझे हरले शिवराय

अर्रे ज्यांनी अखिल महाराष्ट्राचे भूषण बनून जगाला झुकवले,
त्यांचेच अनुयायी आज एकमेकांना भिडले,
कोण ते माथेफिरू ज्यांनी जातीने आम्हाला तोडले,
अर्रे आठवा रे महार मराठे अन 18 पगड जाती एकसाथच लढले,
मग आपल्याला वेगळे करणारे हे नालायक कोण हाय???
हरले भीमराय माझे हरले शिवराय

अर्रे आठवा शिवाजींच्या फौजेत जात पात होती काय?
अर्रे आठवा बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं हाय,
अर्रे इंग्रजांच्या फूट पाडण्याने आपण आजही लढतो हाय,
आपल्याच लढाईने माझ्या भीमाला आणि शिवाला वेदना होणार कि नाय???
हरले भीमराय माझे हरले शिवराय

अर्रे भीमकोरेगाव बी आपलंच अन् रायगड बी आपलाच हाय,
जय भीम बी आपलाच आणि आपलाच जय शिवराय,
कोण एक बोटाचा आणि आपल्याला 'भिडे'कवत हाय,
आपली झालेली एकी त्यांना पाहवत नाय,
मी मराठा तू महार असला तरी तुझ्या माझ्यात नातं भावाचं हाय,
हरले भीमराय माझे हरले शिवराय

अर्रे एका छाताडावर माझ्या शिवबा एका छाताडावर भीम हाय,
तुझी अन माझी माती एकचं, एकचं मराठी माय
मग का रे आपण आज दुष्मन व्हावं सांग आपल्यात फरक काय?
अर्रे माझा भगवा तुझा निळा नाही आपला एकचं तिरंगा हाय,
ह्याचंच संरक्षण करण्या संविधान लिव्हलाय
हरले भीमराय माझे हरले शिवराय

तुझ्या माझ्या भांडणाने आपला भीम आपला शिवबा दुखावलाय,
त्यांनी रक्ताने अन् कष्टानं महाराष्ट्र उभारलाय,
त्याला असं दूषण लावणं आपल्याला शोभणार नाय,
चल एक मुखानं बोलू
जय भीम जय शिवराय
अन शपथ आहे भिमाची अन शिवबाची, आपण परत भांडणार नाय..

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......