दिलदार मित्र निलेश पाटील

प्रिया मित्र निलेश..

कायम सहकार्य प्रवृत्ती युवा प्रेरक तरुण उद्योजक दिलदार व्यक्तिमत्व गाजवणारा .
मोरया बिल्डर्स सह मित्रांची शान शहरातल्या बऱ्याच मित्रमंडळां चे आधारस्तंभ व अनेक व्यावसायिकांचा मान आणि माझा प्राण गोल्डन मॅन नव्हे तर गोल्डन हार्ट असलेला माझा हृदयी मित्र निलेश पाटील👑

कमी वयात खूप जास्त संघर्षमय अनुभव घेत जीवनात असंख्य उतार चढाव आलेत तरी न थांबता न झुकता ना तुटता झपाट्याने प्रगतीला कसा साध्य करायला पाहिजे हे तुझ्या कडून शिकायला हवं .

मागील काही काळात आपण एकत्र अनेक सामाजिक संघटनात्मक कारकीर्दी गाजवली दुसऱ्या राजकारण्यांची झेंडे बॅनर ही लावले..
पण दुनियादारी व्यतिरिक्त सर्वप्रथम स्वतः साठी जगावे ह्या गोष्टी तुझ्याकडूनच  शिकायला मिळाले ...
लहान पणा पासून आत्ता पर्यंत माझ्या साठी केलेलं तुझी प्रत्येक धडपड माझ्या कायम लक्षात आहे व राहणार...

तुझे कायम सकारात्मक वैचारिक दृष्टी अतिशय उल्लेखनीय आहे । जे माझ्या सह इतरांना ही विशेष ऊर्जा प्रेक्षण करण्याचा काम करते.

आज तुझ्या वाढदिवसा निमित्त माझ्याकडे तुला भेट द्यायला काहीच नाही कारण बाजारात तुझ्या अमूल्य सहकार्य मैत्री च्या तुलनेत भेट  करावी अशी कोणत्याही वस्तू ,उपहाराची लायकी नाही.

तुझा सहवास मैत्री संबंध म्हणजे देवाचा एक वरदान😇
तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल लिहायला गेलो तर एक अख्खं पुस्तक बनेल एवढ्या गोष्टी आहेत. माझ्या आयुष्यातल्या अति महत्वाच्या व्यक्तिमध्ये तू एक आहेस. 

आज मी जों कुणी आहे किवा बनण्याचा प्रयत्न करीत आहे त्यात तुझादेखील महत्वाचा वाटा आहे.

तुझी जागा माझ्या आयुष्यात दुसर कुणीही कधीच भरून काढणार नाही.पत्र लांबल असेल पण या सगळ्या लिहिता लिहिता उमटत गेलेल्या भावना आहेत. माझ्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक लिहिणं होईल त्यातल्या लीडरोल मध्ये नक्की तूच असशील.

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वर तुला उद्दान्ड आयुष्य देवो ,
तुझ्या प्रत्येक स्वप्न साकार होवो ही सदिच्छा💐🎂

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......