हो हीच ती पोरं.....
नमस्कार मित्रांनो मला आज लिहिताना एक वेगळ्या प्रकारचे संतुष्टी आणि आनंद होत आहे... ह्या फोटो मधील ही काही पोरं तीच जे बऱ्याच वेळी विभागातील नाक्या वर मस्ती आणि हुल्लड बाजी करतात, ही पोरं तीच आहेत जे आपसात गटबाजी करून शिव्या हाणामारी करतात, ही पोर तीच ज्यांच्या पासून परिसरातील काही नागरिक वैतगलेले असतात... ही पोर तीच जे रात्रि किवा दुपारी मोकाट रस्त्यावर क्रिकेट खेळतांना चेंडू लोकांच्या खिडक्यां पत्र्या वर अपट्टात.. माझ्या विभागातील ही तेच मंडळी आहेत ज्याची तक्रार वर्षाच्या 12 महिने माझ्या कडे कोण ना कोण नागरिक करतात.. चला ही पहिली बाजू आहे, आत्ता मी सांगतो दुसरी बाजू ही तीच पोरं आहेत , जे गणेशोत्सव,स्वातंत्र्य दिवस,आंबेडकर जयंती व इतर सणात रात्र दिवस साज सजावट तैयारीत लागून आपली संस्कृती जोपासतात.. हीच पोर जे शिक्षणासह ,रिक्षाचालवून ,नोकरी-धंदा करून, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वतः ची जवाबदारी पार पाडत आहेत..! ही तीच पोरं आहेत आपदा संकट,किंवा 26 जुलै सारख्या अतिवृष्टी पूरस्थिती , काळात छाती आणि कंबर भर प...