अर्णव च्या आत्महत्याला खरे जबाबदार कोण?
मंगळवारी दुपारी जेव्हा १९ वर्षीय मराठी विद्यार्थी अर्णव खैरे नेहमीपेक्षा लवकर घरी परतला तेव्हा तो त्याच्या वडिलांशी फोनवर बोलला आणि बडबडत राहिला - "त्यांनी मला मारहाण केली"...
फक्त हिंदीत एक ओळ बोलणे चुकले का? जे एका मराठी विद्यार्थिला स्वतःची प्राणज्योती गमवावी लागली... ?
"भाऊ, कृपया पुढे जा, मला ढकलले जात आहे," अर्णवने त्याच्या समोर असलेल्या एका माणसाला हिंदीमध्ये सांगितले. लगेचच, एक गट त्याच्याकडे वळला आणि त्यातील एकाने त्याला जोरदार चापट मारली. "तुला मराठी बोलता येत नाही का? तुला मराठी बोलायला लाज वाटते का?" त्यांनी मागणी केली आणि त्याच्यावर मारहाणीचा वर्षाव केला.
पहिल्या वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला इतका मानसिक धक्का बसला की तो पुढच्या थांब्यावर धावत सुटला, त्याच्या कॉलेजला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडली आणि नंतर कोणताही वर्ग न घेता घरी निघून गेला.
अर्णव चे वडील जितेंद्र खैरे संध्याकाळी कामावरून घरी परतल्यावर त्यांना दरवाजा बंद आढळला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि त्यांना त्यांचा मुलगा गळ्यात ब्लँकेट घालून लटकलेला आढळला,"
एका बापासाठी हृदय पिळवून टाकणारा ह्या दृश्याला
खरा जबाबदार कोण ?
त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार असणारे आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदी मराठी भाषेत तेढ निर्माण करून सुशिक्षित अशिक्षित तरुण पोरांचे टाळके भडकवणारे मंडळी आहेत.
भाषा ही संस्कृती भाषा ही सभ्यता भाषा हे साहित्य भाषा हे प्रेम भाषा हे आनंद भाषा हे तीर्थ भाषा हे न्याय
पण दुर्दैव स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाषेला जीवघेणा हत्यार बनवण्याचे काम या मंडळींनी केले आहे..
यांची मुलं कॉन्व्हेंट शाळेतून परदेशी युनिव्हर्सिटी शिक्षण घेत उच्च श्रेणी लक्झरी लाईफस्टाईल जगात आहेत..
आणि हे आपल्या भाषणाद्वारे सर्वसाधारण गरीब तरुण पोरांच्या माथे फिरवायचे काम करत आहेत..
स्वतःचा विकास करण्याव्यतिरिक्त
तुमच्याकडे तरुणांच्या शहराच्या गावाच्या विकासावर बोलायला मुद्दे नसतील..
तर कमीत कमी गरळ ओकून समाजाची दिशाभूल करत एखाद्याचं जीव जाईल असे राजकारण करू नका..
मी महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेला विचारू इच्छितो या राजकारण्यांद्वारे भाषावादाच्या आगीत आजुन किती अर्णव ची बळी घेतली जाईल..?
अजून किती आई-बाबांना आपल्या मुलांची प्राणाची आहुती द्यावी लागेल..?
माझी कायदे व्यवस्थेला कळकळून प्रार्थना आहे की लवकरात लवकर अर्णव च्या आत्महत्याला कारणीभूत असलेले टवाळ टाळकी गुंड प्रवृत्तीच्या कथित मराठी प्रेमी किवा या राजकारण्यांचे लिंबू गोटी जरी असतील यांना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावे...
शाम गौड SRG
छत्रपती युवा फ्रंट
भाजप युवा मोर्चा कल्याण ग्रामीण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा